• Review
  • Enquire Now
  • shape
    shape

    बांधकाम पर्यवेक्षक कोर्स

    बांधकाम पर्यवेक्षक कोर्स

    बांधकाम पर्यवेक्षक कोर्स

    सरकारी नोकरीची संधी: असिस्टंट सिव्हिल इंजिनिअरिंग पदे उपलब्ध

    ZP, PWD, पंचायतीराज व महानगरपालिका गर्व्हमेंट कॉन्ट्रॅक्टर लायसन काढण्यासाठी उपयुक्त असा कोर्स

    जिल्हा परिषद (वर्ग-७) रजिस्ट्रेशन व सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ठेकेदारांचे १० लाख पर्यंतचे License काढता येते

    कोर्स नंतर शासकीय, निमशासकीय अथवा खाजगी मध्ये Govt.ऑफ इंडियाची Apprenticeship करु शकता

    कोर्स पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र शासन (महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ) यांचे प्रमाणपत्र

    कोर्सचे फायदे:

    लघुपाट बंधारे, पाटबंधारे, रोजगार हमी योजना, पाणीपुरवठा विभाग, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, गोदावरी विकास महामंडळ, कृष्ण खोरे विकास महामंडळ, तापी विकास महामंडळ M.I.D.C. सिडको, हडको, म्हाडा आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, जनरल रिझर्व्ह इंजिनिअरींग फोर्स इ ठिकाणी स्थापत्य अभियांत्रिकी सहायक पदावर शासकीय नोकरीची संधी

    बांधकाम पर्यवेक्षक किंवा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स - मंगलमूर्ती क्लासेस

    बांधकाम पर्यवेक्षक किंवा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स हे आजच्या बांधकाम उद्योगातील एक महत्त्वाचे क्षेत्र आहे. बांधकाम कामाची वेगवेगळी आव्हाने व आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रकल्पांचा यशस्वी देखरेख करणे हे या कोर्सच्या उद्दिष्टांपैकी एक आहे. मंगलमूर्ती क्लासेसद्वारे दिल्या जाणाऱ्या या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना स्थापत्य अभियांत्रिकीचे मूलभूत ज्ञान, तांत्रिक कौशल्ये आणि वास्तविक प्रकल्पांवर काम करण्याची संधी दिली जाते.

    “शिकणे हीच जीवनाची खरी संपत्ति आहे .”

    मंगलमूर्ती क्लासेस

    कोर्सचे महत्त्व:

    बांधकाम क्षेत्र हे आज सर्वात वेगाने वाढणाऱ्या क्षेत्रांपैकी एक आहे. विविध प्रकारच्या इमारती, पुल, रस्ते आणि इतर पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांसाठी तज्ञ बांधकाम पर्यवेक्षकांची मोठी मागणी आहे. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक हे अभियंत्यांचे काम सुलभ करण्यात महत्वाची भूमिका बजावतात. या कोर्समुळे विद्यार्थी प्रकल्प व्यवस्थापन, बांधकाम साहित्याची निवड, सुरक्षितता मापदंड आणि गुणवत्ता नियंत्रण यांसारख्या महत्त्वाच्या बाबींमध्ये तज्ञ होतात.

    कोर्सची रचना:

    सिद्धांत आणि तांत्रिक ज्ञान: या कोर्समध्ये बांधकामाची तांत्रिक माहिती दिली जाते. यात प्रकल्प नियोजन, आरेखन व मोजमाप, भूमापन, बांधकाम साहित्याचे गुणधर्म आणि त्यांचा वापर यांचा समावेश होतो.

    व्यावहारिक प्रशिक्षण: बांधकाम पर्यवेक्षण हे पूर्णपणे व्यावहारिक काम असते. त्यामुळे या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना विविध प्रकल्पांवर प्रत्यक्ष काम करण्याची संधी दिली जाते. त्यांना साइटवर जाऊन बांधकाम प्रक्रियेची निरीक्षणे करायला शिकवले जाते.

    सॉफ्टवेअर प्रशिक्षण: स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये सॉफ्टवेअरचे महत्त्व वाढले आहे. यासाठी Autocad, STAAD Pro यांसारख्या सॉफ्टवेअर्सवर देखील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते, जेणेकरून त्यांना डिजाईन आणि विश्लेषण करण्याची क्षमता प्राप्त होईल.

    व्यावसायिक कौशल्ये: या कोर्समध्ये प्रकल्प व्यवस्थापन, संघटनात्मक कौशल्ये आणि समस्येचे निराकरण यासारख्या व्यावसायिक कौशल्यांवर भर दिला जातो.

    करिअर संधी:

    • बांधकाम पर्यवेक्षक: विद्यार्थ्यांना बांधकाम साइटवर पर्यवेक्षणाची संधी मिळते.
    • स्थापत्य सहाय्यक: अभियंते आणि आर्किटेक्ट्स यांना सहाय्य करण्यासाठी ही भूमिका असते.
    • प्रकल्प व्यवस्थापक: प्रकल्पांचे यशस्वी नियोजन आणि अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मिळते.

    निष्कर्ष:

    मंगलमूर्ती क्लासेसद्वारे दिला जाणारा बांधकाम पर्यवेक्षक किंवा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स हा विद्यार्थ्यांना स्थिर आणि उज्ज्वल करिअर घडवण्यासाठी उपयुक्त ठरतो. आधुनिक तंत्रज्ञान, व्यावहारिक कौशल्ये आणि सखोल ज्ञान यांचा समन्वय साधणारा हा कोर्स बांधकाम क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी आदर्श आहे.

    छत्रपती संभाजी महानगरपालिका
    संवर्ग पदाचे नांव नेमणूकीसाठी अर्हता व पध्दती
    तांत्रिक सेवा
    श्रेणी -3
    विद्युत पर्यवेक्षक अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची विद्युत (Electrical) अभियांत्रिकी शाखेची पदविका किंवा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (S.S.C.) उत्तीर्ण, शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे तारतंत्री अभ्यासक्रम पूर्ण व तदनंतर एन.सी.टी.व्ही. टी. चे प्रमाणपत्र आवश्यक.
    ब) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
    तांत्रिक सेवा
    श्रेणी -3
    स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक/अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी शाखेची पदविका किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाचा पाठ्यक्रम उत्तीर्ण.
    ब) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
    सार्वजनिक आरोग्य सेवा
    श्रेणी -3
    स्वच्छता निरीक्षक अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी.
    ब) स्वच्छता निरीक्षक पदविका उत्तीर्ण.
    क) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
    पशुवैद्यकीय सेवा
    श्रेणी-3
    पशुधन पर्यवेक्षक अ) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (H.S.C.) उत्तीर्ण.
    ब) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पशुसंवर्धनाची पदविका उत्तीर्ण.
    क) शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था/ खाजगी रुग्णालयातील संबंधित विषयातील कामाचा किमान 2 वर्षांचा अनुभव आवश्यक.
    (ड) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
    अग्निशमन सेवा
    श्रेणी -3
    प्रमुख अग्निशामक अ) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत परीक्षा (S.S.C.) उत्तीर्ण.
    ब) राष्ट्रीय / राज्य अग्रिशमन प्रशिक्षण केंद्र / महाराष्ट्र अग्रिशमन सेवा अकादमी यांचा 6 महिने कालावधीचा अग्रिशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम / प्रगत पाठ्यक्रम (Advanced Course) पूर्ण करणे आवश्यक.
    क) शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये अग्निशामक (Fireman) या पदावर किमान 3 वर्षांचा अनुभव आवश्यक.
    ड) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
    इ) शारीरिक पात्रता :
    1) उंची 165 सें.मी. (महिला उमेदवारांची उंची 157 सें.मी.)
    2) छाती साधारण 81 सें.मी. फुगवून 86 सें.मी. जास्त (महिला उमेदवारांसाठी लागू नाही.)
    3) वजन 50 कि.ग्रॅ. (महिला उमेदवारांचे वजन किमान 46 कि. ग्रॅ.)
    4) दृष्टी चांगली. (बिना चष्म्याने दृष्टी 6 / 6 तसेच Ishihara Chart नुसार रंगदृष्टी चांगली).
    फ) वयोमर्यादा उमेदवाराचे वय 30 वर्षांपेक्षा जास्त असू नये. (शासन नियमानुसार जोखीमभत्ता व युनिफॉर्म अपकीप)
    सार्वजनिक आरोग्य सेवा
    श्रेणी -3
    उद्यान सहाय्यक अ) मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाची बी.एस्सी. (हॉर्टिकल्चर्स) अॅग्रीकल्चर / बॉटनी/फॉरेस्ट्री पदवी / मान्यताप्राप्त विद्यापीठाची वनस्पती शास्त्रातील पदवी.
    ब) शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थेकडील कृषी उद्यान क्षेत्रातील उद्यान निरीक्षक अथवा समकक्ष पदावरील किमान 3 वर्षांचा अनुभव आवश्यक.
    क) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
    सांगली मिरज महानगरपालिका
    सेवा व संवर्ग पदनांम नेमणूकीची पध्दत व टक्केवारी
    १) नामनिर्देशन
    २) पदोन्नती
    ३) प्रतिनियुक्ती
    नाम निर्देशनाने भरावयाच्या पदांसाठी कमाल वयोमर्यादा नेमणूकीसाठी अर्हता व पध्दती
    श्रेणी- ३
    अभियांत्रिकी सेवा
    कनिष्ठ अभियंता
    (विद्युत)
    नामनिर्देशन ५०% ३३ वर्षे अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची विद्युत अभियांत्रिकी शाखेची अथवा समतुल्य शाखेची पदविका व ०३ वर्षांचा संबंधित कामाचा अनुभव.
    किंवा
    विद्युत अभियांत्रिकी शाखेतील अथवा समतुल्य शाखेची पदवी.
    पदोन्नती २५% ---- नामनिर्देशनासाठी विहित केलेली अर्हता धारण केलेल्या अथवा अभियांत्रिकी महाविद्यालय नाशिक येथील कनिष्ठ अभियंता व्यवसायिक परिक्षा उत्तीर्ण असलेल्या स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अथवा समकक्ष पद धारण करणाऱ्या व सदर पदावर ०३ वर्षांचा अनुभव आवश्यक.
    श्रेणी- ३
    अभियांत्रिकी सेवा
    कनिष्ठ अभियंता
    (यांत्रिकी / अॅटोमोबाईल )
    नामनिर्देशन ५०% ३३ वर्षे अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची यांत्रिकी / अॅटोमोबाईल अभियांत्रिकी शाखेची पदविका आणि ०३ वर्षांचा संबंधित कामाचा अनुभव.
    किंवा
    यांत्रिकी / अॅटोमोबाईल अभियांत्रिकी शाखेतील पदवी.
    पदोन्नती २५% ---- नामनिर्देशनासाठी विहित केलेली अर्हता धारण केलेल्या अथवा अभियांत्रिकी महाविद्यालय नाशिक येथील कनिष्ठ अभियंता व्यवसायिक परिक्षा उत्तीर्ण असलेल्या यांत्रिकी / अॅटोमोबाईल अभियांत्रिकी सहाय्यक हे पद धारण करणाऱ्या व सदर पदावर ०३ वर्षांचा अनुभव आवश्यक.
    श्रेणी-3
    अभियांत्रिकी सेवा
    स्थापत्य अभियांत्रिकी
    सहाय्यक /
    सब ओव्हरसियर /
    सव्हेअर
    नामनिर्देशन १००% ३३ वर्षे अ) महाराष्ट्र राज्य माधमिक मंडळाची शालान्त परिक्षा उत्तीर्ण आणि
    ब) शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था आरेखक (स्थापत्य) पाठ्यक्रम परिक्षा उत्तीर्ण.
    किंवा
    शासनमान्य औद्योगिक तंत्र निकेतनाची भूमापक पाठ्यक्रम परिक्षा उत्तीर्ण.
    किंवा
    शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची स्थापत्य अभियांत्रिकी (कंन्स्ट्रक्शन) पाठ्यक्रम परिक्षा उत्तीर्ण.
    श्रेणी-3
    अभियांत्रिकी सेवा
    अनुरेखक नामनिर्देशन १००% ३३ वर्षे अ) राज्य माध्यमिक / उच्च माध्यमिक शालांन्त शिक्षण मंडळाची परिक्षा उत्तीर्ण.
    ब) शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा अनुरेखक (यांत्रिकी) व तत्सम समतुल्य अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र.
    नवी मुंबई महानगरपालिका
    पदनांम व श्रेणी नेमणूकीची पध्दत व टक्केवारी
    १) नामनिर्देशन
    २) पदोन्नती
    ३) प्रतिनियुक्ती
    नेमणूकीसाठी अर्हता व पध्दती
    कार्यकारी अभियंता (स्थापत्य)
    (श्रेणी- १. अभियांत्रिकी सेवा)
    पदोन्नती १००% नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील उप अभियंता (स्थापत्य) या पदावर किमान ३ वर्षांची सेवा पूर्ण झालेल्या अधिकाऱ्याची सेवाज्येष्ठता व गुणवत्तेच्या आधारे पदोन्नतीने नियुक्ती करता येईल.
    प्रतिनियुक्ती पदोन्नतीने अधिकारी उपलब्ध न झाल्यास, पदोन्नतीने अधिकारी उपलब्ध होईपर्यंत, राज्य शासनाच्या कार्यकारी अभियंता या पदावरील अधिकाऱ्यांमधून शासनाकडून प्रचलीत धोरणानुसार प्रतिनियुक्तीने नियुक्ती करता येईल.
    उप अभियंता (स्थापत्य)
    (श्रेणी-१ अभियांत्रिकी सेवा)
    पदोन्नती - १००% नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील सहाय्यक अभियंता (स्थापत्य) या पदावर किमान ३ वर्षांची सेवा पूर्ण झालेल्या अधिकाऱ्याची सेवाज्येष्ठता व गुणवत्तेच्या आधारे पदोन्नतीने नियुक्ती करता येईल.
    सहाय्यक अभियंता (स्थापत्य)
    (श्रेणी-२, अभियांत्रिकी सेवा)
    पदोन्नती - १००% नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदावर किमान ३ वर्षांची सेवा पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्याची सेवाज्येष्ठता व गुणवत्तेच्या आधारे पदोन्नतीने नियुक्ती करता येईल.
    कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
    (श्रेणी-३, अभियांत्रिकी सेवा)
    नामनिर्देशन /
    सरळसेवा - १००%
    अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी शाखेची पदवी.
    ब) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
    स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक
    (श्रेणी-३, तांत्रिक सेवा)
    नामनिर्देशन /
    सरळसेवा - १००%
    अ) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (S.S.C.) उत्तीर्ण.
    ब) शासकीय तांत्रिक संस्थेचा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाचा पाठ्यक्रम उत्तीर्ण.
    क) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाची अर्हता परीक्षा उत्तीर्ण.
    ड) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
    अहमदनगर महानगरपालिका
    सेवा व संवर्ग पदनांम नेमणूकीची पध्दत व टक्केवारी
    १) नामनिर्देशन
    २) पदोन्नती
    ३) प्रतिनियुक्ती
    नाम निर्देशनाने भरावयाच्या पदांसाठी कमाल वयोमर्यादा नेमणूकीसाठी अर्हता व पध्दती
    अभियांत्रिकी सेवा
    श्रेणी - १
    उप अभियंता (स्थापत्य)
    सिव्हिल इंजिनियर या पदांचे समावेशन
    नामनिर्देशन ५०% ३३ वर्षे (१) मान्यताप्राप्त विद्यापिठाची स्थापत्य अभियांत्रीकी शाखेतील पदवी.
    (२) राज्य शासनाकडील / स्थानिक स्वराज्य संस्थामधील कनिष्ठ अभियंता या पदावरील किमान ३ वर्षांचा अनुभव आवश्यक.
    (३) पदव्युत्तर पदवी आणि / अथवा समकक्ष पदावरील कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य
    पदोन्नती ५०% ---- (१) मान्यताप्राप्त विद्यापिठाची स्थापत्य अभियांत्रीकी शाखेतील पदवी/ पदविका.
    (२) उपरोक्त अर्हता धारण करणाऱ्या महापालिका आस्थापनेवरील ज्येष्ठता व गुणवत्ता या आधारे कार्यरत शाखा अभियंता या संवर्गात किमान ०५ वर्षांचा अनुभव अथवा कनिष्ठ अभियंता या संवर्गात ०८ वर्षांचा अनुभव आवश्यक.
    अभियांत्रिकी सेवा
    श्रेणी - २
    शाखा अभियंता (स्थापत्य)
    [कनिष्ठ अभियंता / ज्यु. इंजिनियर (सिव्हील)]
    नामनिर्देशन ५०% ३३ वर्षे (अ) मान्यताप्राप्त विद्यापिठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी / पदविका परिक्षा उत्तीर्ण.
    (ब) समतुल्य पदावरील कामाच्या अनुभव धारकास प्राधान्य. अभियांत्रिकी सेवा शाखा अभियंता नामनिर्देशन ५०%
    पदोन्नती ५०% ---- (अ) मान्यता प्राप्त विद्यापिठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी / पदविका परिक्षा उत्तीर्ण.
    (ब) महापालिका आस्थापनेवरील ज्येष्ठता व गुणवत्ता यांच्या आधारे कार्यरत कनिष्ठ अभियंता पदावरील किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक.
    अभियांत्रिकी सेवा
    श्रेणी-3
    कनिष्ठ अभियंता
    (स्थापत्य)
    नामनिर्देशन १००% ३३ वर्षे (अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदविका.
    (ब) ३ वर्षाचा संबंधित कामाचा अनुभव. किंवा
    (क) स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदवी परीक्षा उत्तीर्ण.
    अभियांत्रिकी सेवा
    श्रेणी-3
    अभियांत्रिकी
    सहायक
    नामनिर्देशन १००% ३३ वर्षे (अ) महाराष्ट्र राज्य माध्यमिक मंडळाची शालांत परीक्षा उत्तीर्ण आणि
    (ब) शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था आरेखक (स्थापत्य) पाठ्यक्रम परीक्षा उत्तीर्ण किंवा शासनमान्य औद्योगिक तंत्र निकेतनाची भूमापक पाठ्यक्रम परीक्षा उत्तीर्ण. किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची स्थापत्य अभियांत्रिकी (कंन्सट्रक्शन) पाठ्यक्रम परीक्षा उत्तीर्ण.
    अभियांत्रिकी सेवा
    श्रेणी-3
    गवंडी नामनिर्देशन १००% ३३ वर्षे (१) एस एस सी पास
    (२) शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा गवंडी कोर्स पास.
    अभियांत्रिकी सेवा
    श्रेणी-४
    बिगारी/ वॉचमन
    (बिगारी / मजूर / वॉचमन / चौकीदार)
    नामनिर्देशन १००% ३३ वर्षे शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडील सदर संवर्गाच्या प्रचलित सेवा प्रवेश नियमानुसार.
    पिंपरी चिंचवड महानगरपालिका
    पदनाम व वेतनश्रेणी नेमणूकीकरिता अर्हता
    अनिमल किपर
    लेवल S-३
    र.रु. १६६००-५२४००
    (१) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील पशुवैद्यकीय पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक.
    (२) प्राणी संग्रहालयाचे ठिकाणी किमान ०५ वर्षे कामाचा अनुभव आवश्यक.
    (३) मान्यता प्राप्त शासन संस्थेकडील संगणक अर्हता आवश्यक.
    समाजसेवक
    पे लेवल S-१३
    र.रु. ३५४००-११२४००
    (१) एम.एस.डब्ल्यू. ही पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक.
    (२) मान्यता प्राप्त शासन संस्थेकडील संगणक अर्हता आवश्यक.
    स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक
    लेवल S-६
    र.रु. १९९००-६३२००
    (१) शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदाच्या सेवाप्रवेश नियमानुसार.
    (२) मान्यता प्राप्त शासन संस्थेकडील संगणक अर्हता आवश्यक.
    जिल्हा परिषद महाराष्ट्र
    पदाचे नाव शैक्षणिक अर्हता व अनुभव
    वरिष्ठ सहाय्यक संविधिमान्य विद्यापीठाची पदवी प्रमाणपत्र धारण करणारे उमेदवार
    वरिष्ठ सहाय्यक (लेखा) मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करीत असतील या बाबत लेखा शास्त्र व लेखा परिक्षा हे विशेष विषय घेऊन वाणिज्य शाखेतील पदवी धारण करणाऱ्या अथवा पहिल्या किंवा दुस-या वर्गातील पदवी धारण करणा-या अथवा कोणत्याही सरकारी कार्यालयात अथवा व्यापारी संस्थेत अथवा स्थानिक प्राधिकरणात तीन वर्षाहून कमी नसेल इतक्या अखंड कालावधी पर्यंत लेखा विषयक कामांचा पदवी नंतरचा प्रत्यक्ष अनुभव असलेल्या उमेदवारांना अधिक पसंती दिली जाईल.
    विस्तार अधिकारी (कृषि) ज्यांनी मान्यताप्राप्त विद्यापीठाची कृषि विषयातील पदवी किंवा इतर कोणतीही समतुल्य अर्हता धारण केली असेल अशा उमेदवारांची नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल. परंतू कृषि विषयातील उच्च शैक्षणिक अर्हता आणि कृषि विषयक कामाचा अनुभव किंवा कृषि पद्धतीचे व्यवसायाचे ज्ञान व ग्रामीण जीवनाचा अनुभव असेल अशा उमेदवारांना अधिक पसंती देण्यात येईल.
    स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा तुल्य परीक्षा उत्तीर्ण झाले असतील, आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाचा एक वर्षाचा पाठ्यक्रम परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार संविधीमान्य तत्सम खालील पाठ्यक्रम १) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या एक वर्षाचा पाठ्यक्रम उत्तीर्ण २) आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समन (वास्तुशास्त्रीय आरेखक), किंवा ३) कन्स्ट्रक्शन सुपरवायझर (बांधकाम पर्यवेक्षक) किंवा ४) आरेखक (स्थापत्य) हा दोन वर्षाचा पाठ्यक्रम उत्तीर्ण किंवा ५) सैनिकी सेवेतील बांधकाम पर्यवेक्षकाचे अनुभव प्रमाणपत्र किंवा स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी धारण करीत असतील असे उमेदवार.
    नाशिक महानगरपालिका
    सेवा व संवर्ग पदनांम नेमणूकीची पध्दत व टक्केवारी
    १) नामनिर्देशन
    २) पदोन्नती
    ३) प्रतिनियुक्ती
    नेमणूकीसाठी अर्हता व पध्दती
    श्रेणी-३
    तांत्रिक सेवा
    हेडमिस्तरी
    S-८
    २५५००-८११००
    नामनिर्देशन १००% नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील मिस्तरी या पदावर किमान ०३ वर्षांची सेवा पुर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांमधून सेवाजेष्ठता व गुणवत्ता या आधारे.
    श्रेणी-३
    तांत्रिक सेवा
    मिस्तरी
    S-६
    १९९००-६३२००
    नामनिर्देशन ५०% अ) माध्यमिक शालांत परीक्षा (एसएससी) उत्तीर्ण.
    ब) आयटीआय स्थापत्य सहाय्यक / गवंडी (मेसन)/ बिल्डींग मेंटेनन्स कोर्स उत्तीर्ण.
    क) महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT परीक्षा उत्तीर्ण किंवा D.O.E.A.C.C. सोसायटीच्या अधिकृत C.C.C. किंवा O स्तर किंवा A स्तर किंवा B. स्तर किंवा C. स्तर पैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र.
    ड ) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
    पदोन्नती ५०% नामनिर्देशनासाठी विहित केलेली अर्हता धारण करणाऱ्या नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील रोड मुकादम या पदावरील किमान ०३ वर्षांची सेवा पुर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांमधून सेवाजेष्ठता व गुणवत्ता या आधारे.
    श्रेणी-४
    तांत्रिक सेवा
    रोड मुकादम
    S-३
    १६६००-५२४००
    नामनिर्देशन ५०% अ) माध्यमिक शालांत परीक्षा (एसएससी) उत्तीर्ण.
    ब) आयटीआय स्थापत्य सहाय्यक / गवंडी (मेसन)/ बिल्डींग मेंटेनन्स कोर्स उत्तीर्ण.
    क) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
    पदोन्नती ५०% नामनिर्देशनासाठी विहित केलेली अर्हता धारण करणाऱ्या नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील बिगारी या पदावरील किमान ०३ वर्षांची सेवा पुर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांमधून सेवाजेष्ठता व गुणवत्ता या आधारे.
    नांदेड महानगरपालिका
    पदाचे नाव
    (कंत्राटी पध्दतीने)
    पद संख्या आवश्यक शैक्षणिक पात्रता व अनुभव वय एकत्रित वेतन
    (प्रतिमहा)
    कंत्राटी कनिष्ठ
    (स्थापत्य)
    ०३ १. मान्यता प्राप्त विदयापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी (BE).
    किंवा
    २. स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची (मागासवर्गीय) पदविका (DIPLOMA) परीक्षा उत्तीर्ण
    ३. संबधित कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य कंत्राटी स्थापत्य
    १८ ते ३८ वर्ष (खुला)
    १८ ते ४३ वर्ष (मागासवर्गीय)
    अ.जा. - 0१
    खुला - ०२
    रु. १८०००/-
    कंत्राटी कनिष्ठ
    अभियांत्रिकी सहाय्यक
    ०७ १. महाराष्ट्र राज्य माध्यमीक मंडळाची शालांत परीक्षा उत्तीर्ण
    किंवा
    २. शासन मान्य औदयोगिक प्रशिक्षण संस्था आरेखक (स्थापत्य) पाठयक्रम 2 वर्षाची परीक्षा उत्तीर्ण किंवा इतर मान्यताप्राप्त संस्था यांचेकडील आरेखक (स्थापत्य) / बांधकाम पर्यवेक्षक पाठ्यक्रम उत्तीर्ण
    ३. अनुभव असल्यास प्राधान्य.
    १८ ते ३८ वर्ष (खुला)
    १८ ते ४३ वर्ष (मागासवर्गीय)
    अ.जा. - 0१
    अ.ज. - 0१
    वि.जा/भ.ज. 0१
    खुला - ०४
    रु. ११०००/-
    म्हाडा
    पदनांम संवर्ग नेमणूकीसाठी अर्हता व पध्दती नाम निर्देशनाने भरावयाच्या पदांसाठी कमाल वयोमर्यादा
    मिळकत व्यवस्थापक / प्रशासकीय अधिकारी १) महाराष्ट्र शासन मान्य विद्यापीठातील पदवी धारण केलेली असावी. आणि
    २) व्यवसाय व्यवस्थापन (Business Management) मधील वाणिज्य व वित्त मधील (Marketing and Finance) पदवी / पदविका धारण केलेली असावी.
    ३)वरील शैक्षणिक अर्हता धारण केल्यानंतर शासकीय / निमशासकीय / मंडळे / महामंडळे / सरकारी उपक्रमे अथवा नोंदणीकृत सुप्रस्थापित कंपनी फर्म कार्यालयात वाणिज्य व वित्त क्षेत्राचा प्रशासकीय कामाचा ५ वर्षांचा अनुभव असावा.
    १९ ते ३८ वर्षे
    सहायक अभियंता
    (श्रेणी-२)
    १) महाराष्ट्र शासन मान्य विद्यापीठातील स्थापत्य शाखेतील पदवी धारण केलेली असावी.
    किंवा
    शासनाने त्याच्याशी समतुल्य म्हणून घोषित केलेली अन्य कोणतीही अर्हता धारण केलेली असावी.
    १८ ते ३८ वर्षे
    सहायक विधी सल्लागार १) महाराष्ट्र शासन मान्य विद्यापीठातील कायदयाची १८ ते ३८ पदव्युत्तर पदवी धारण केलेली असावी.
    २) वरील शैक्षणिक अर्हता धारण केल्यानंतर उच्च न्यायालय अथवा राज्यातील कनिष्ठ न्यायालयातील वकिलीचा विशेषतः भूधारणा (Land Tenures), मालमत्तेचे हस्तांतरण, घरबांधणी मालकी हक्काचे प्लॅटस, सहकारी गृहनिर्माण संस्था आणि इतर प्राधिकरणाशी संबंधित असलेल्या कामांचा पाच वर्षापेक्षा कमी नसेल इतका अनुभव असावा.
    १८ ते ३८ वर्षे
    कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहाय्यक १) ज्याने वास्तुविशारद या विषयातील पदवी / पदव्युत्तर १९ ते ३८ पदवी धारण केलेली असावी.
    २) ज्यांची Council of Architecture (COA)मध्ये नोंदणी झालेली असेल.
    १९ ते ३८ वर्षे
    कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) महाराष्ट्र शासन मान्य विद्यापीठातील स्थापत्य शाखेतील पदवी धारण केलेली असावी.
    किंवा
    शासनाने त्याच्याशी समतुल्य म्हणून घोषित केलेली अन्य कोणतीही अर्हता धारण केलेली असावी.
    १८ ते ३८ वर्षे
    सहाय्यक १) महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी १९ ते ३८ धारण केलेली असावी.
    २) प्रशासकीय कामाचा ५ वर्षापेक्षा जास्त कालावधीचा अनुभव असावा.
    १९ ते ३८ वर्षे
    स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून देण्यात आलेले स्थापत्य १८ ते ३८ अभियांत्रिकी मधील प्रमाणपत्र किंवा त्यांच्याशी समतुल्य अर्हता धारण केलेली असावी. १८ ते ३८ वर्षे
    वरिष्ठ लिपिक १) महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी १९ ते ३८ धारण केलेली असावी.
    २) प्रशासकीय कामाचा ३ वर्षापेक्षा जास्त कालावधीचा अनुभव असावा.
    १९ ते ३८ वर्षे
    कनिष्ठ लिपिक-टंकलेखक १) महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी धारण केलेली असावी.
    आणि
    २) मराठी टंकलेखनाचे किमान ३० श.प्र.मि. वेगमर्यादेचे किंवा इंग्रजी टंकलेखनाचे किमान ४० श.प्र.मि. वेगमर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे.
    १९ ते ३८ वर्षे
    PWD